Satyajit Tambe : रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या: तांबे

Satyajit Tambe : रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या: तांबे

0
Satyajit Tambe : रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या: तांबे
Satyajit Tambe : रस्त्यांची दुरुस्ती व रखडलेल्या प्रकल्पांना गती द्या: तांबे

Satyajit Tambe : संगमनेर: काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र, राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांच्याकडे केली आहे.

नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर

रस्त्यांचे रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी

संगमनेर मधील रस्त्यांचे रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची आमदार सत्यजित तांबे यांनी भेट घेऊन रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी केली आहे. यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर करूनही अनेक कामे रखडून ठेवली. यामुळे संगमनेर तालुक्यातील काही रस्त्यांची दुरावस्था झाली. या कामासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, आता नव्या सरकारने या रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीची तरतूद येणाऱ्या बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली.

अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’

लवकरच आवश्यक कार्यवाहीचे मंत्र्यांचे आश्वासन (Satyajit Tambe)

याचबरोबर जुना पुणे – नाशिक महामार्ग शिवाजी पुतळा ते प्रवरा नदी पूल या प्रकल्पासाठी आधी मंजूर केलेल्या पाच कोटी रुपयांची व्यतिरिक्त अधिक निधी मंजूर करून हा रस्ता पूर्ण करावा. याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून सुरू केलेल्या संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरला जोडणाऱ्या पुलाचे कामही मंद गतीने सुरू असून हेही लवकरात लवकर उच्च दर्जाचे व्हावे, याची मागणीही आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. संगमनेर मधील विविध रस्ते व रखडलेल्या प्रकल्पांबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याबरोबर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरात लवकर व आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार सत्यजित तांबे यांना दिले आहे.