Satyashodhak Bahujan Aghadi : सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सिद्धार्थनगर आणि लालटाकी शाखा समित्या जाहीर

Satyashodhak Bahujan Aghadi : सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सिद्धार्थनगर आणि लालटाकी शाखा समित्या जाहीर

0
Satyashodhak Bahujan Aghadi : सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सिद्धार्थनगर आणि लालटाकी शाखा समित्या जाहीर
Satyashodhak Bahujan Aghadi : सत्यशोधक बहुजन आघाडीच्या सिद्धार्थनगर आणि लालटाकी शाखा समित्या जाहीर

Satyashodhak Bahujan Aghadi : नगर : सत्यशोधक बहुजन आघाडीच्या (Satyashodhak Bahujan Aghadi) सिद्धार्थनगर आणि लालटाकी (Lal Taki) शाखा समित्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त

सिद्धार्थनगर शाखेच्या अध्यक्षपदी शेखर वाघमारे

सिद्धार्थनगर शाखेच्या अध्यक्षपदी शेखर वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विजय भारस्कर उपाध्यक्ष, अशोक साठे सचिव, राहुल शेकटकर कार्याध्यक्ष, उमेश दिनकर सहसचिव, लक्ष्मण शिंदे संघटक आणि संजय ससाणे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लालटाकी शाखेच्या अध्यक्षपदी सचिन सुनील शेलार (Satyashodhak Bahujan Aghadi)

लालटाकी शाखेच्या अध्यक्षपदी सचिन सुनील शेलार यांची निवड झाली आहे. या समितीत चेतन पावलस पवार उपाध्यक्ष, डॉ. प्रवीण खरात सचिव, आणि अजित वसंत पवार खजिनदार म्हणून निवडण्यात आले आहेत. किशोर पवार यांची या वेळी शहराचे सहसंघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष सुनील ढोले सह शाम वैराळ, जालिंदर शेलार, योगेश साबळे, रुपेश जगधने, राहुल ठोकळ इत्यादी शहर समिती सदस्या हस्ते सदरील नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमास सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे सर, तसेच जिल्हाध्यक्ष संदीप सकट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या सर्व नियुक्त्या पार पडल्या.या वेळी समितीच्या वतीने शहराध्यक्ष सुनील ढोले,

कार्यक्रमादरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांशी नागेश गायकवाड, अरविंद पाटोळे आणि के. राजगुरू यांनी संवाद साधला.

बगाडे सरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना सदिच्छा देताना, “जोमाने कार्यास लागा,” असे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी दलित-आदिवासींच्या विकास निधीचा गैरवापर व बहिणींच्या नावाने सुरू असलेल्या योजनांकडे निधी वळवण्याची गंभीर समस्या अधोरेखित केली. यासंदर्भात दलित-आदिवासी निधीविषयी स्वतंत्र कायदा करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संघटित लढा उभारण्याची गरज त्यांनी मांडली.

संदीप सकट यांनी सत्यशोधक बहुजन आघाडीची आवश्यकता, विचारधारा, आणि आगामी कार्यदिशा स्पष्ट केली.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सूत्रसंचालक शाम वैराळ यांनी तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कार्यकर्ता शाहीर प्रवीण सोनवणे यांनी त्यांच्या सत्यशोधकी ललकारीसारख्या गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. आजच्या दिवसाचे औचित्य साधून अ.नगर शहर समितीचे कार्यालयाचे उद्घाटन सचिन बगाडे सरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता कामगार, कष्टकरी, दलित-आदिवासी समाजाच्या न्यायहक्काच्या लढ्यात अग्रभागी राहण्याचा, तसेच शिक्षण, रोजगार अशा मुलभूत प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार करत करण्यात आली.