Satyashodhak Trailer : सत्यशोधक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित;चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला  

Satyashodhak: सत्यशोधक’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला आहे.

0
Satyshodhak

Satyashodhak : नगर : समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले (Mahatama Jyotirao Phule) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ (Satyashodhak) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा (Trailer launch event) पार पडला आहे. यावेळी प्रत्यक्षात सावित्रीमाई आणि ज्योतिराव प्रेक्षकांसमोर अवतरले होते.

नक्की वाचा : मराठा आरक्षणाच्या आड येणारांना गुलाल लागू देणार नाही : मनोज जरांगे

‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये या सोहळ्यात प्रवेश केला. यामुळे उपस्थितांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं अशी भावना सगळ्यांच्या समोर उभी राहिली असल्याचे दिसून आले. ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हिलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती.

अवश्य वाचा : सुदृढ आरोग्यासाठी आहारात ज्वारीचा समावेश आवश्यक : डॉ.दळवी

आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंची उलगड या ट्रेलरमध्ये होते, यामुळे चित्रपट नक्की कसा असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी हे कलाकार सत्यशोधक या चित्रपटात झळकणार आहेत. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे.  विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ जानेवारी, २०२४ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here