Savitribai Phule : नगर : राज्य सरकारच्या (State Government) वतीने देण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन शिक्षकांना जाहीर झाला आहे. यामध्ये एक माध्यमिक शिक्षक एक प्राथमिक शिक्षक आणि आदिवासी शिक्षक या तिघांना हा पुरस्कार जाहीर (Awards Announced) झाला आहे.
अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव
यांना जाहीर झाला पुरस्कार
राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. प्राथमिक शिक्षक विभागात शितल मोहन झरेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव ता. नेवासे, माध्यमिक शिक्षक विभागात विद्या रामभाऊ भडके शिवाजी हायस्कूल बोधेगाव (तालुका शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना तर तिसरा पुरस्कार आदिवासी विभागातून अनिल सीताराम डगड शिळवंडी ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांना जाहीर झाला आहे.
नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार
मुंबईमध्ये या पुरस्काराचे वितरण (Savitribai Phule)
येत्या २२ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये या राज्यशिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून राज्यातील १०९ शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षक ३८ माध्यमिक शिक्षक ३९ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक १९ आठ विभागातून थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ८ विशेष कला क्रीडा दोन दिव्यांग शिक्षक एक स्काऊट गाईड दोन असे एकूण १०९ पुरस्कार दिले जाणार आहेत.