Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर

0
Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर
Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर

Savitribai Phule : नगर : मानवाधिकार (Human Rights) अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिम्मित्ताने सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या विचारांचा वारसा जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा जाधव बंडेलू (Adv. Neelima Bandelu) यांना वारसा सावित्रीचा पुरस्कार देवून जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर येथील जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या (Clara Bruce High School) सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी मिशनच्या अध्यक्षा डॉ. विजया जाधव या उपस्थित होत्या, यावेळी व्यासपीठावर भारत सरकार, जीएसटी व कस्टम्स विभागाचे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. सुभाष भोर, मानवाधिकार अभियानचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, ऊर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे,‌ प्रा. सॅम्युएल वाघमारे, भैरवनाथ वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

नीलिमा बंडेलू यांना ‘वारसा सावित्रीचा’ पुरस्कार २०२६ प्रदान

समाजसेवेचा वारसा जपत सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, प्रशासकीय व मानवी हक्कांच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा जाधव- बंडेलू यांना यंदाचा ‘वारसा सावित्रीचा’ पुरस्कार २०२६ प्रदान करून कार्यगौरव करण्यात आला.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

सावित्रीबाईंचे शिक्षण मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस येथे पूर्ण (Savitribai Phule)

प्रमुख अतिथी न्यायमूर्ती योगेश पैठणकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आणि आजच्या सामाजिक वास्तवाचे महत्त्व अधोरेखित केले. अनंत अडचणींवर मात करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, असे त्यांनी सांगितले. महात्मा फुले यांनी मिशनरी शाळेत शिक्षण घेतले होते. स्त्री शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण अहमदनगर (अहिल्यानगर) येथील मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस येथे पूर्ण करून घेतले. त्यानंतर सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे सावित्रीबाईंचे प्रारंभीचे प्रशिक्षण ज्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये झाले, त्या वास्तूचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष अतिथी ॲड. सुभाष भोर यांनी आपल्या मनोगतात नीलिमा जाधव–बंडेलू यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या महिलांचा पुरस्काराद्वारे सन्मान करणे हेच सावित्रीबाईंना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी नमूद केले आणि या पुरस्कारासाठी मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशनचे अभिनंदन केले.

Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर
Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांचे सुरूवातीचे प्रशिक्षण झालेल्या ऐतिहासिक मराठी मिशनच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलचे संवर्धन गरजेचे : न्यायमूर्ती योगेश पैठणकर

अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. विजया जाधव म्हणाल्या की, पुरस्कार ही खरी सुरुवात असून आता पुरस्कार मिळालेल्या नीलिमा ताईंनी अधिक जोमाने कार्य पुढे सुरू ठेवले पाहिजे. मिशनरी कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले कि देशातील पहिली शाळा मिशनऱ्यांनी काढली, शिक्षणाची द्वारे त्यांनी सर्वसामान्यांना खुले करून दिले. त्यानी कधीच जाती धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही, त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले. नीलिमा जाधव- बंडेलू यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या निवेदनामध्ये सांगितले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यातील कामांचा विचार करता त्यांचा तीन टप्प्यांमध्ये विचार करावा लागतो. सुरुवातीच्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक आयुष्या वर मिशनऱ्यांचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. महात्मा फुलेंनी अहिल्यानगर येथे फरार बाईंची शाळा प्रत्यक्ष आपल्या मित्राबरोबर येऊन पाहिले आणि त्यानंतर सावित्री आणि फातिमा यांना अहिल्यानगर फरार बाईंच्या शाळेमध्ये टीचर्स डिप्लोमा करण्याकरिता पाठविले. त्यानंतर पुण्यातील शाळा सुरू केली. ज्योतिबांनी त्यांच्या कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षक म्हणून कामही केल्याच्या नोंदी आहेत.

सावित्रीबाई या केवळ शिक्षिका आहेत आहे जे सारखं सांगितलं जातं ते त्यांच्या कामाचे मापन कमी केल्यासारखे आहे असं मला वाटतं. शिक्षिकेच्या पलीकडे सावित्रीबाईंनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेलं काम, फसले गेलेल्या विधवांसाठी उघडलेले अनाथाश्रम, आपल्या पतीच्या नंतर सत्य धर्माचं आणि एकूणच महात्मा फुलेंची चळवळ ज्या पद्धतीने निष्ठेने नेटाने आणि धैर्याने त्यांनी पुढे नेली हे त्यांचे खूप महत्त्वाचं योगदान सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आहे. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंना लिहिलेल्या पत्रामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे.

पन्नास सत्यशोधकी कार्यकर्त्यांना दुष्काळाच्या काळामध्ये अकारण अटक केली गेली. त्यावेळी गोऱ्या साहेबांच्या समोर उभा राहून सावित्रीने आपले कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल धीट पणाने त्यांच्याशी चर्चा केली, आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. गोऱ्या साहेबांनी पाच गाड्या पाठवून दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवली. 200 वर्षांपूर्वीच्या अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षिकेशिवाय केलेली तर सगळ्या कामांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये असं मला वाटतं.

महात्मा फुले आणि सावित्रीचा विचार हा विविध सामाजिक विषयांवरील एक सर्वांगीण पुरोगामी आणि रुढीपरंपरांना तोडून आणि सनातन यांच्या ब्राह्मण शाहीच्या विरोधात उभा केलेला अत्यंत ऐतिहासिक लढा आहे. जेव्हा आपण साऊ-ज्योतीचे स्मरण करतो तेव्हा त्यांच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्याप्रमाणे आजच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या विचारावर ठाम उभे राहून त्यांना अभिवादन करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. असे सांगून त्यांनी आपल्या मानोगतात पुरस्काराबद्द्ल आभार व्यक्त करत अनेक ऐतिहासिक संदर्भ देत सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ॲड. संतोष गायकवाड म्हणाले की, दरवर्षी मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिम्मित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सन २०१८ पासून वारसा सावित्रीचा या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून सावित्रीच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या महिलांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो. सावित्री व फातिमा यांचे सुरुवातीचे प्रशिक्षण अहमदनगर येथील मराठी मिशनच्या क्लेरा ब्रूस या ठिकाणी झाले त्यामुळे अहमदनगरचा हा वैभवशाली इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. मिशनरी कार्य करणाऱ्या संस्थांच्या कार्याला अभिवादन म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम मिशनरी संस्थेत करण्यात येतो.

आभार प्रदर्शन करतांना भैरवनाथ वाकळे यांनी पुरस्कार मिळालेल्या नीलिमा बंडेलू यांच्या कार्यास मानवंदना देत त्यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी युनूसभाई तांबटकर, अशोक सब्बन, शिवाजीराव नाईकवाडी, सत्यशील शिंदे, कमलाकर देढे, ॲड. बेबी बोर्डे, प्रा. प्रियदर्शन बंडेलू यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवाधिकार अभियान व उर्जिता सोशल फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.