Zee Marathi New Serial:झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!  

0
Zee Marathi New Serial:झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!  
Zee Marathi New Serial:झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला!  

Zee marathi New Serial : सध्या मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच ‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनीने काहीच दिवसांपूर्वीच ‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali) या नव्या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली. आता या नव्या मालिकेचा मुहूर्त ठरला असून नुकताच ‘सावळ्याची जणू सावली’चा नवीन प्रोमो (New Promo) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा : ‘उदे गं अंबे’ मालिकेतून उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा; मालिकेतुन ‘या अभिनेत्याचे कमबॅक

‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता व अभिनेत्री झळकणार हे देखील स्पष्ट झालं होतं. परंतु, मालिकेच्या प्रसारणाची वेळ व तारीख वाहिनीकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. ही माहिती आता समोर आली आहे.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या प्रोमोत नेमके काय ?(Zee Marathi New Serial)

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील या प्रोमोत दाखवण्यात आले की, मुख्य नायिकेचा म्हणजेच प्राप्ती रेडकरचा आवाज फार गोड असतो. परंतु, तिच्या गोड आवाजाचं क्रेडिट कोणीतरी वेगळंच घेऊन जातं हे नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर आणि ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साईंकीत कामत या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री सुरेखा तळवलकर तिलोत्तमा ही साईंकीतच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांना लेकासाठी सुंदर व देखणी सून हवी असते. पण, सावली त्यांच्या सौंदर्याची व्याख्या बदलणार का ? हे प्रत्यक्ष मालिकेत पाहायला मिळेल.

अवश्य वाचा : ‘ताकाला जायचं आणि भांडे लपवायचं असं माझं धोरण नाही’-अजित पवार

मालिकेत कोणते कलाकार झळकणार ? (Zee Marathi New Serial)


‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी करण, आशिष कुलकर्णी, भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे हे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. झी मराठी वाहिनीने नुकतीच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका १६ सप्टेंबरपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेच्या सर्व कलाकारांवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here