Sayaji Shinde : संगमनेर: चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे (Nilwande Dam) येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी आपण सातत्याने काम केले. निळवंडेमुळे उंचीवरील भागातून कालवे घेता आल्याने दुष्काळी भागामध्ये पाणी आले आहे. कालव्यांच्या वरच्या बाजूचे शेतकरी जे बाकी आहे त्यांनाही पाणी देण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा असून दुष्काळी भागासाठीच निळवंडे व कालवे पूर्ण केले आहे. सततची विकास कामे आलेले पाणी यामुळे या भागात समृद्धी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. तर अत्यंत आदर्शवत नेतृत्व असलेले बाळासाहेब थोरात हे समाजकारणातील खरे हिरो असल्याचे प्रतिपादन सिने अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी केले.
नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका
देवराईच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम
चिंचोली गुरव येथे पूर्व भाग सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी व देवराईच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेते सयाजी शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, दुर्गाताई तांबे, गणपतराव सांगळे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, नवनाथ आरगडे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, सरपंच विलास अण्णा सोनवणे, विलास मास्तर सोनवणे, अंकुश ताजने, योगेश भालेराव, अनिल कांदळकर, रामनाथ कुटे, पप्पू गोडगे, विजय गोडगे, चेअरमन अशोकराव गोडगे, व्हा. चेअरमन विठ्ठल मेढे, योगेश सोनवणे, राजेंद्र कहांडळ, वाल्मीक गोडगे आदींसह सोसायटीचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवराई फाउंडेशन व चिंचोली गुरव ग्रामस्थ यांच्यावतीने चिंचोली गुरव मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, (Sayaji Shinde)
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि निळवंडे धरणाची जागा निश्चित करण्यात आली. त्यामुळे उंचीवरून कालवे येऊन या परिसरामध्ये पाणी आले. कारखान्याच्या यंत्रणेच्या मदतीने पाणी आल्याने समृद्धी आहे. या परिसराकरता आपण सतत विकासकामे केली आहे, गावाच्या कामांसाठी निधी दिला आहे, विविध रस्ते पूर्ण झाले आहेत. साखळी बंधारे निर्माण झाले आहे. जे शेतकरी निळवंड च्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांना पाणी देण्यासाठी आराखडा पूर्ण करण्यात आला आहे. हे पाणी देण्यासाठी आपलाच पाठपुरावा राहणार आहे. शेतकऱ्यांचे कष्ट आणि विकास कामे यातून समृद्धी दिसत आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, मल्याळम, तेलगू अशा विविध भाषांमध्ये चित्रपट केले असून मराठी माणूस हा राष्ट्रीय पातळीवर काम करतो, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.
तर सिने अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, आज अनेकजण पक्ष बदलत आहे. परंतु पक्षनिष्ठा व जनतेसाठीची तळमळ असे आदर्श व्यक्तिमत्व असलेले बाळासाहेब थोरात हे राजकारणातील व समाजकारणातील खरे हिरो आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या वयोमानाइतके वृक्षारोपण केले पाहिजे. याचबरोबर देशी वृक्ष ही ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देत असून चांगला श्वास घेणारा हा सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे ते म्हणाले. तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू असून सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे. या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच विलास अण्णा सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र घोडके पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे व नामदेव कहांडळ यांनी केले. तर विलास मास्तर सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.