School : नगर : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भिंगार माध्यमिक उच्च माध्यमिक विदयालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ (School) या उपक्रमातंर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान (CM Mazi Shala Sundar Shala)यशस्वीपणे राबविले गेले. शासनाने (Government) ठरवून दिलेल्या परिपत्रकाप्रमाणे एकूण ३० समित्या स्थापन केल्या गेल्या १०० गुणांच्या या अभियानात विदयालयाने ९९ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे ११ लाखाचे पारितोषिक मिळविले.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन
विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग (School)
अभियानादरम्यान शाळा व शाळेचा परिसर स्वच्छता, सुविचार लेखन, वृक्षारोपन या बरोबरच तंबाखूमुक्त, प्लास्टिक मुक्त या विषयावरही विद्यालयाने काम केले. या अभियाना दरम्यान महावाचन, आरोग्य तपासणी, कौशल्याधिष्टित शिक्षण, सांस्कृक्तिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी मंत्रिमंडळ, परसबाग, एन. सी. सी. उपक्रम, अमृतवाटिका, पोषण आहार सहभाग, स्वच्छतादूत, बचत बँक असे उपक्रम राबविले गेले. यात इयत्ता ५वी ते १२वी च्या एकूण १६५२ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
नक्की वाचा: मराठ्यांनी पीएम मोदींविरोधातच थाेपटले दंड; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार
विविध उपक्रमांचे आयोजन (School)
विद्यार्थी मंत्रिमंडळ स्थापन करताना गुप्त मतदान पध्दतीचा वापर करून विद्यार्थ्यांना मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला. अभियाना दरम्यान शहरातील व भिंगार गावातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, पर्यावरण तज्ञ, सरपंच, बँकेतील अधिकारी, औदयौगिक प्रशिक्षण संस्थेतील तज्ञ मार्गदर्शक, क्रिडा क्षेत्रातील मार्गदर्शक, लेखक यांची व्याख्याने विदयार्थ्यांसाठी आयोजित केली गेली. याचा विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी लाभ घेतला. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभयकुमार फिरोदिया, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यावाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, उपाध्यक्ष अशोकजी मुथा व नियामक मंडळाचे व शाळा समितीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
अभियानात विद्यालयाचे पदाधिकारी प्राचार्य पडोळे, उपप्राचार्य कासार, पर्यवेक्षिका व अभियानांच्या मुख्य निमंत्रक मनीषा गायकवाड सर्व शिक्षक, सेवक विदयार्थी व पालक यांचा सक्रिय सहभाग असल्याने हे अभियान यशस्वी झाले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या मधील कृतीसमितीत काम करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती, वेळेचे योग्य नियोजन, सहकार्य, वाचन लेखन कौशल्य, स्वजाणीव, संवेदनशिलता, निसर्गप्रेम, जबाबदारी, नेतृत्त्व, आरोग्याबाबत जागरूकता आदी गुणांचा विकास झाला.