School : श्रीरामपूर : शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा आत्मा आहे. त्याने ठरवले तर शिक्षण (Education) क्षेत्रातील अडचणीवर तो मार्ग काढू शकतो, याचा वस्तुपाठ घालून दिला आहे तालुक्यातील एकलहरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोघा शिक्षिकांनी. एकलहरे गावात उर्दू व मराठी माध्यमाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (School) एकच कॅम्पसमध्ये भरते. मराठी माध्यमाच्या (Marathi medium) शाळेमध्ये आठवाडी परिसरातील बालके शिक्षणासाठी येतात. हा परिसर वीट भट्टी कामगारांसाठी परिचित आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. मुले शिकावी, शिक्षणाच्या प्रवाहात यावी, यासाठी आपली शाळा स्वच्छ आणि सुंदर असावी, या हेतूने शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा भोज व शिक्षिका प्रतिमा साळुंके यांनी दोन महिन्यापूर्वी शाळेत रंग सजावट व भिंतीवर चित्रे काढण्याचे काम सुरू केले.
नक्की वाचा: ‘जरांगेंना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तर मीडियामध्ये राहायचं’-परिणय फुके
माझी शाळा सुंदर शाळा झाली
देशाचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फुले, आपला जिल्हा, तालुका, इंग्रजी अल्फाबेट, मराठी मुळाक्षरे, विज्ञानाचे विविध उपक्रम, जलचक्र, कार्टून, पाढे हा सर्व ज्ञानाचा खजिना चित्ररूपाने शाळेतील भिंतीवर रेखाटला. यासाठी शिक्षिका साळुंके व मुख्याध्यापिका भोज यांनी एकत्र येऊन सुमारे ४० हजार रुपये खर्च केला. त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त योगदानामुळे एकलहरेची शाळा आज खरोखर माझी शाळा सुंदर शाळा झाली आहे.
अवश्य वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज!महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार
शिक्षिकेंनी स्व:खर्चाने सजविल्या शाळा (School)
शिक्षिकेंनी स्व:खर्चाने शाळा सजविल्याने सेवा सोसायटीचे चेअरमन अन्सारभाई जहागीरदार, ज्येष्ठ पत्रकार लालमोहमद जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते विलास ठोंबरे, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच रमेश कोल्हे व ग्रामपंचायत सदस्यांनी दोन्ही शिक्षिकेंचे कौतुक केले आहे. गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उक्कलगाव केंद्रप्रमुख अशोक विटनोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकेंनी हा उपक्रम राबविला.