School : छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात; माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन

School : छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात; माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन

0
School : छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात; माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन
School : छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात; माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन

School : नगर : छोट्या शाळांचे (School) अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या व शिक्षकांना (Teacher) अतिरिक्त ठरविणाऱ्या २८ ऑगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा शासन निर्णय (Government decision) रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या (Maharashtra State Teachers’ Conference) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या शिष्टमंडळाने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले.

नक्की वाचा : राजधानी दिल्लीला अलर्ट;लाल किल्ला,कुतुब मिनार सह ऐतिहासिक इमारतींच्या सुरक्षेत वाढ

शिक्षक उपस्थित

यावेळी जिल्हा कार्यवाह शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, एस. सी. धीवर, एस. डी. उदार, आर. बी. पवार, जे. एस. कोळकर, एस. सी. छजलाने, अभिजीत गवारे, विठ्ठल ढगे, एस. एस. शिरसाठ, दीपक आरडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

अवश्य वाचा : पाकिस्तानचा भारतावर ‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरसद्वारे सायबर हल्ल्याचा डाव?

ग्रामीण भागातील छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात (School)

शासन निर्णय २८ ऑगस्ट २०१५ मध्ये दुरुस्ती करून शासन निर्णय ८ जानेवारी २०१६ नुसार इयत्ता नववी, दहावी या वर्गासाठी शिक्षकांची किमान तीन पदे मंजूर होती. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या शाळांमध्ये तीन शिक्षक उपलब्ध होत होते. मात्र, तीन मधील निकषानुसार इयत्ता नववी मध्ये वीस विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी मध्ये वीस विद्यार्थी असणे आवश्‍यक आहे. तर शिक्षक पद मंजूर होणार आहे. अन्यथा इयत्ता नववी, दहावी गटासाठी कोणतेही शिक्षक पद मंजूर होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, असे ही त्यांनी म्हटले आहे.