School Building Collapse : श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली 

School Building Collapse : श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली 

0
School Building Collapse : श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली
School Building Collapse : श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

School Building Collapse : श्रीगोंदा: श्रीगोंदा नगरपरिषद (Shrigonda Municipal Council) हद्दीतील लोखंडेवाडी (Lokhandewadi) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत प्रशासकीय दिरंगाईमुळे अखेर जमीनदोस्त झाली (School Building Collapse) आहे. गेल्या दोन वर्षांपासून धोकादायक असलेल्या या इमारतीच्या निर्लेखनाचा (पाडण्याचा) प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित होता. मंजुरी मिळण्यापूर्वीच ही इमारत रात्रीच्या सुमारास कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. शाळा इमारत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तात्काळ इमारत निर्लेखनाचे आदेश दिले.    

नक्की वाचा: आता राष्ट्रवादीचा दादा कोण?राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?

मंजुरी मिळण्यापूर्वीच कोसळली इमारत

११ डिसेंबर १९४७ रोजी स्थापन झालेली ही शाळा सुरुवातीला मारुती मंदिरात भरत असे. मात्र स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे १९९३ साली शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम झाले होते. मात्र, कालांतराने या खोल्या अत्यंत धोकादायक झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा पुन्हा एकदा मारुती मंदिरात भरवली जात होती. धोकादायक इमारतीचे निर्लेखन प्रस्ताव ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी देण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे मंजुरी मिळण्यापूर्वीच ही इमारत कोसळली. कोसळल्या शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देखील शाळेच्या भिंतीचे दगड पडत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून गटशिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडी यांनी इमारतीच्या निर्लेखनाच्या सूचना दिल्या. स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही महिन्यात मंजुरी मिळविणारी ही शहरातील दुसरी शाळा असून शाळेच्या विस्तारासाठी लोखंडेवाडी येथील बाबाजी किसन लोखंडे व विठ्ठल किसन लोखंडे यांनी या शाळेसाठी ४ गुंठे जागा बक्षीस दिली आहे.

अवश्य वाचा: राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग

प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त (School Building Collapse)

प्रशासकीय दिरंगाईमुळे शाळेची इमारत कोसळल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष लोखंडे, सोमनाथ लोखंडे यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत “आम्ही ज्या मंदिरात बसून शिक्षण घेतले, आजही आमच्या मुलांना त्याच मंदिरात बसावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे. जर शासनाने तातडीने नवीन खोल्या मंजूर केल्या नाहीत, तर सर्व पालक आपल्या पाल्यांना घेऊन पंचायत समितीत वर्ग भरवतील असा इशारा यावेळी दिला.”घटनेची माहिती समजताच गटविकास अधिकारी राणी फराटे, नगर पालिका मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, गटशिक्षण अधिकारी कानडी मॅडम, आणि विस्तार अधिकारी सुनीता वाजे नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका अनभुले, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, अख्तर शेख, ऋषिकेश बोरुडे, माजी नगरसेवक सतीश मखरे, विकास बोरुडे आणि पांडुरंग पोटे यांनी शाळेत भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. शाळा कोसळल्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.