नगर : राजस्थानमधून (Rajasthan) एक मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थानच्या झालावाड (Jhalawar) जिल्ह्यातील पिपलोडी या सरकारी प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळून (School Building Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. यात चार मुलांचा मृत्यू (Death of four children) झाला असून ८ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींना दिलासा;अर्जाची छाननी थांबली, जुलैचे पैसे कधी मिळणार
दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू (School Building Collapse in Rajasthan)
डांगीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, ज्याठिकाणी शाळेचे छप्पर कोसळले तिथे जवळपास १७ मुले उपस्थित होते. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.
अवश्य वाचा : अखेर महायुतीचे ठरलं!महामंडळ वाटपासाठी ४४- ३३ -२३ चा फॉर्म्युला
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात केले दाखल (School Building Collapse in Rajasthan)
झालावाड जिल्ह्यातील या शाळेत २७ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. झालावाड येथील पिपलोडी शाळेची इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद असल्याचे ते म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचार सुविधा देण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त केले.