School Time : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर,पुणे, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये बिबट्याने धुमाकूळ (Leopard Roar)माजवला आहे. काही ठिकाणी बिबट्याने हल्ला (Lepord Attack) केल्याने अनेक निष्पाप नागरिकांसह लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) यांनी दिले आहेत. वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वेळेत बदल (Changes in school hours) करण्यात आला असून, जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नक्की वाचा: राज्यात थंडीची हुडहुडी वाढली; हवामान विभागाचा अंदाज काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये विशेषकरून नगर आणि पारनेर तालुक्यात, बिबट्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली आहे. याठिकाणी अनेक विद्यार्थी शाळेत पायी प्रवास करतात. ऊस शेती, जंगल आणि डोंगराळ भाग यांसारख्या बिबट्यांचा वावर असलेल्या भागातून त्यांचा प्रवास असतो. सध्या ऊस तोडणीमुळे शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे, ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.
अवश्य वाचा: मुंबईतील वानखेडे स्टेडियम कसं तयार झालं? जाणून घ्या सविस्तर…
शाळेची नवीन वेळ काय ? (School Time)
सध्या हिवाळा सुरु असल्याने लवकर अंधार पडतो. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी येताना अंधारात प्रवास करावा लागतो. ज्यामुळे ते बिबट्यांच्या हल्ल्यांना अधिक बळी पडू शकतात. बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका आणि लवकर पडणारा अंधार लक्षात घेता, बिबट्यांचा वावर असलेल्या भागांतील शाळांच्या वेळेत बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापन समिती किंवा शाळा समितीच्या मंजुरीने शाळांची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी ४ अशी करण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचू शकतील.
सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे बंधनकारक (School Time)
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासादरम्यानच्या धोक्यांबद्दल आणि आवश्यक खबरदारीबद्दल माहिती दिली जाईल. तसेच, पालकांनाही मुलांसोबत शाळेत जाण्या-येण्याबाबत, विशेषतः असुरक्षित भागांमध्ये, महत्त्व पटवून देण्यासाठी पालक-शिक्षक सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.



