Schools Teachers : शिक्षकांविना शाळा; संतप्त भोजदरी ग्रामस्थांचा शासन व प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

Schools Teachers : शिक्षकांविना शाळा; संतप्त भोजदरी ग्रामस्थांचा शासन व प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

0
Schools Teachers : शिक्षकांविना शाळा; संतप्त भोजदरी ग्रामस्थांचा शासन व प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
Schools Teachers : शिक्षकांविना शाळा; संतप्त भोजदरी ग्रामस्थांचा शासन व प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

Schools Teachers : संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील डोंगर दर्यात अतिशय दुर्गम भागात वसलेल्या भोजदरी गावात जिल्हा परिषदेची १ ली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत मंजूर चार शिक्षक (Schools Teachers) संख्या असताना मागील दीड वर्षांपूर्वी एका शिक्षकांची व आता एका शिक्षकाची बदली झाली त्यानंतर दोनच शिक्षकांवर या सात वर्गांची जबाबदारी आहे. या बाबत नागरिकांनी शासन प्रशासन स्तरावर वेळोवेळी शिक्षकांची मागणी करुनही शिक्षक उपलब्ध होत नसल्याने अखेर नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत विद्यार्थ्यांचे सोमवारी (ता. २२) दाखले काढून शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य वाचा: शहरात नागरी सुविधांचा बोजवारा; शहर भाजपने आक्रमक होत आयुक्तांना घातला घेराव

मुलांचे शैक्षणिक नुकसान

भोजदरी गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेत फक्त दोनच शिक्षक शिल्लक राहिल्याने त्यांच्यावर सात वर्गांची जबाबदारी आहे. त्यात शिक्षकांना शासकीय कामे व शैक्षणीक कामे त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे आमच्या मुलांचे शिक्षणच होऊ शकत नाही म्हणून ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी, बिडीओ, अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटे, संगमनेर विधानसभेचे अमोल खताळ यांना माहिती देऊन निवेदने दिली होती. मात्र, या गोष्टीची कुणीही दखल घेत नाही. मुलांच्या भवितव्याशी खेळले जात असून मुलांचे भवितव्य धोक्यात आहे. म्हणून मूलं फक्त भात खाण्यासाठीच शाळेत जात असतील तर मूल घरी ठेवलेली बरी जर या गोष्टीची दोन दिवसांत दखल घेतली नाही तर सोमवारी (ता. २२) मुलांना शाळेत न पाठवता मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे पालक पोपट वाळुंज यांनी सांगितले.

नक्की वाचा : आमदार रोहित पवारांच्या आमसभेत नागरिकांचा तक्रारींचा भडीमार

शिक्षकांची मागणी करुनही कोणीच दखल घेत नाही (Schools Teachers)

शाळा ही दुर्गम भागात असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे शासन, प्रशासनाला अथवा लोकप्रतिनिधींना काहीच देणेघेणे नाही. वेळोवेळी शिक्षकांची मागणी करुनही कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे आम्हाला शाळा बंद करण्याचा व दाखले काढून घेण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश पोखरकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील लोहोकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पोपट वाळुंज, विकास हांडे, बाबाजी हांडे, दिनेश सावंत, जिजाभाऊ भुतांबरे, विजय चव्हाण, रामदास चव्हाण, सीमा शिंदे, अलका वाळुंज, निकीता कोकाटे, सुमन उगले, प्रतिमा वाळुंज, शोभा वाळुंज यांनी स्पष्ट केले.