Seeds : बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर धाव

Seeds : बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर धाव

0
Seeds : बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर धाव
Seeds : बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर धाव

Seeds : कर्जत : जून महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कर्जत तालुक्यातील बहुतांश मंडळ क्षेत्रात समाधानकारक पाऊस (Rain) झाल्याने शेतकरी बांधवांनी खरीप पेरणीची (Kharif Sowing) लगबग सुरू केली आहे. ठिकठिकाणी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड पहावयास मिळत आहे. तूर, मका आणि उडीद बियाणांच्या (Seeds) खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे कृषी सेवा केंद्रचालक (Agricultural Service Centre) सांगत आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात;मालगाडीची एक्सप्रेसला धडक,पाच जणांचा मृत्यू

खरीप पेरणीसाठी अनेक ठिकाणी लगबग (Seeds)

यंदा कर्जत तालुक्यात मृग नक्षत्राच्या मान्सून पावसाने वेळेवर आणि दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवामध्ये समाधानाचे वातावरण आहे. १ ते १५ जुन दरम्यान अत्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने कर्जत तालुक्यात खरीप पेरणीसाठी अनेक ठिकाणी लगबग सुरू झाली आहे. कर्जत तालुक्यात सरासरी २३२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात राशीन मंडळ क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचल्याने वापसा होण्याची वाट शेतकरीवर्ग पाहत आहे. तालुक्यातील सहा मंडळ क्षेत्रातील सर्वाधिक पाऊस राशीन भागात पडला असून त्याची सरासरी ३९१ मिमी असून मिरजगाव मंडळ क्षेत्रात १४१ मिमी सर्वात कमी पावसाची नोंद आहे.

यंदा कर्जत तालुक्यात तुर, मका, उडीद आणि कांदा बियाणांच्या खरेदीकडे शेतकरी बांधवांचा कल दिसत असून वरील पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात अपेक्षित असल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी म्हटले आहे. तालुक्यातील सर्वच कृषी केंद्रावर खरीप पेरणीसाठी शेतकरी बांधवांची गर्दी दिसत आहे. खरीप नियोजन आणि मागणीनुसार तालुक्यात कृषी विभागाने बियाणे, खतांचा साठा उपलब्ध केला आहे. काही अडचण अथवा समस्या असल्यास तालुका कृषी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन म्हस्के यांनी केले आहे.

अवश्य वाचा : विहिरीत लावलेल्या जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट; तीन जणांचा जागीच मृत्यू

कर्जत कृषी विभागाकडून कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन (Seeds)

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने १७ जून ते १ जुलै दरम्यान कर्जत तालुका कृषी विभागाकडून कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कृषी विषयक विविध तंत्रज्ञान, लागवड, पिकांची गुणवत्ता, पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजना यासह प्रगतशील शेतकऱ्यांशी सवांद आणि शासनाच्या विविध योजना विषयक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here