
Self Defense Lessons for Girls : नगर : राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुली केवळ सुशिक्षितच नाही, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तितक्याच सक्षम व सुदृढ व्हाव्यात, या उदात्त हेतूने शालेय शिक्षण विभाग (Department of School Education) आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा व जीवन कौशल्य प्रशिक्षण’ (‘Rani Lakshmibai Self-Defense and Life Skills Training’) अभियानांतर्गत एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.
नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली व शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली ‘राष्ट्र प्रथम’ हे ध्येय समोर ठेवून जिल्ह्यातील कोकमठाण येथे १७ आणि १८ फेब्रुवारी २०२६ रोजी या भव्य राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन (Self Defense Lessons for Girls) करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
आत्मा मलिक इंटरनॅशनल’च्या मैदानावर आयोजन(Self Defense Lessons for Girls)
कोकमठाण येथील ‘आत्मा मलिक इंटरनॅशनल’च्या विस्तीर्ण मैदानावर आयोजित या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार महिला प्रशिक्षणार्थी, एन.सी.सी. आणि गाईड विद्यार्थिनी अत्यंत उत्साहाने सहभागी झाल्या आहेत.
या प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित प्रशिक्षक ग्रँडमास्टर शिफूजी शौर्य भारद्वाज व त्यांची टीम या सर्व प्रशिक्षणार्थींकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सराव करून घेत आहेत. अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जात असून, यामध्ये तायक्वांदो व स्वसंरक्षणाचे इतर अद्ययावत प्रकार शिकविण्यावर विशेष भर दिला जात आहे. केवळ शारीरिक कसरतीच नव्हे, तर संकटाच्या वेळी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव कसा करावा, यासाठीचे मानसिक बळही या प्रशिक्षणातून दिले जात आहे.

या राज्यस्तरीय ‘मेंटरिंग’ उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सुमारे ४००० शालेय विद्यार्थिनींना प्रशिक्षक म्हणून तयार केले जात आहे. या प्रशिक्षित मुलींमार्फत राज्यातील २२००० शाळांतील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकारे प्रशिक्षित झालेल्या महिला प्रशिक्षिका आता राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जाऊन हजारो विद्यार्थिनींना अधिक सक्षमपणे स्वसंरक्षणाचे धडे देतील, ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास व स्वतःच्या सुरक्षेची भावना खऱ्या अर्थाने वृद्धिंगत होईल.
या अभिनव उपक्रमाचे संकल्पक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः या कार्यशाळेस उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत आहेत. “या उपक्रमामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थिनी केवळ सुरक्षितच होणार नाहीत, तर त्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सुदृढ होतील,” असा विश्वास श्री. भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. कोकमठाण येथील हे भव्य प्रशिक्षण शिबीर भविष्यातील एक सुरक्षित, स्वावलंबी आणि सामर्थ्यशाली पिढी घडवण्यासाठीचा एक अत्यंत महत्त्वाचा ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींसाठी हे प्रशिक्षण जानेवारी २०२६ पासूनच शासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये मार्शल आर्ट, माजी सैनिकांमार्फत प्रशिक्षण आणि योगसाधना इत्यादी बाबींचा समावेश आहे.
याच प्रशिक्षणाच्या दर्जावाढीसाठी ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, ज्यान्वये अधिक दर्जेदार प्रशिक्षक तयार होतील आणि विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणाचा मूळ हेतू साध्य होईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शासनाचा महिला सबलीकरण, स्वसंरक्षण व आत्मविश्वास वाढीसाठीचा हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.


