Selfie Point : मैं भारत हूँ! सेल्फी पॉईंटचे कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात प्रदर्शन

Selfie Point

0
Selfie Point
Selfie Point

Selfie Point : कर्जत: लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) ज्वर आता चांगलाच रंगला असून प्रशासकीय यंत्रणेदेखील आपली कंबर कसली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि जनजागृतीसाठी (Public Awareness) सर्वोतोपरी प्रयत्न राबविले जात आहे. कर्जत प्रांत कार्यालयात स्वीप समितीच्यावतीने सेल्फी पॉईंट (Selfie Point) उभारला असून स्वत: सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील आणि कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Selfie Point
Selfie Point

हे देखील वाचा: लंकेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचा माेठा गाैप्यस्फाेट

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती

लोकसभा निवडणूक उत्सव सुरू असून राजकीय पक्षासह प्रशासनाची देखील लगबग सुरू झाली आहे. यंदा कडक उन्हाच्या तडाख्यात निवडणूक पार पडणार असून कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि त्याची जनजागृतीसाठी कर्जत महसूल प्रशासन व कर्जत स्वीप समितीकडून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मैं भारत हूँ! सेल्फी पॉईंट कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले.

नक्की वाचा: तुझा अरविंद केजरीवाल करू; भाजप नेत्यांकडून कारवाईच्या धमक्या, राेहित पवारांचा आराेप

उत्सव निवडणुकीचा (Selfie Point)

या सेल्फी पॉईंटवर “आपले मतदान १३ मे रोजी आहे. मैं भारत हूँ!, उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा, मै मेरे लिये मतदान करुंगा, अहमदनगरसाठी एकच वादा, १३ मे रोजी मतदानाचा इरादा” असे घोषवाक्य रेखाटले आहे. एक वोट सेल्फी तो बनता है असे म्हणत कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार गुरू बिराजदार यांनी स्मित हास्याने आपले फोटो सेल्फी पॉईंटवर काढत सर्वसामान्य मतदारांनी याचा लाभ घ्यावा. तसेच १३ मे रोजी निर्भिडपणे जास्तीत-जास्त मतदान घडवत मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here