Lal krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. या कारणास्तव त्यांना आज (ता.१४) दिल्लीतील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय बुलेटिन लवकरच जारी केले जाऊ शकते.
नक्की वाचा : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे!
लालकृष्ण अडवाणी ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित (Lal Krishna Advani)
लालकृष्ण अडवाणी ९७ वर्षांचे आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांत त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अडवाणी हे गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते. त्याच वर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही देण्यात आला.आरोग्याच्या समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो देखील शेअर केला होता, ज्यामध्ये मोदी लालकृष्ण अडवाणींना पुष्पगुच्छ देताना दिसत होते. पंतप्रधान मोदींनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “अडवाणींच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.”
अवश्य वाचा : मोठी बातमी!अभिनेता अल्लू अर्जुनला अटक
लालकृष्ण अडवाणींची कारकीर्द ? (Lal Krishna Advani)
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची येथे झाला. १९४२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. १९८६ ते १९९०, पुन्हा १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. याशिवाय ते सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष राहिले आहेत.अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्री आणि उप पंतप्रधानही होते.