Sentence of rigorous imprisonment : निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवणे पडले महागात; चालकास एक वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा

Sentence of rigorous imprisonment : निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवणे पडले महागात; चालकास एक वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा

0

Sentence of rigorous imprisonment : नगर : निष्काळजीपणे व वेगात ट्रॅक्टर चालवून अपघात घडवून एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्याप्रकरणी न्यायालयाने चालकास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा (Sentence of rigorous imprisonment) व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

निष्काळजीपणे व वेगात वाहन चालवून व्यक्तीस धडक

अहिल्यानगर तालुक्यातील डोंगरगण येथील काशिनाथ तुकाराम पटारे (वय ४५, रा. डोंगरगण, ता. जि. अहिल्यानगर) हे डोंगरगण- मांजरसुंबा रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत असताना त्यांनी वाहन निष्काळजीपणे व वेगात चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीस धडक दिली. तसेच वाहनाचे लाईट व इंडिकेटर योग्यरित्या न वापरल्यामुळे हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास (Sentence of rigorous imprisonment)

या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायाधीश के. जी. पिंगळे यांनी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता प्रमोद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी दीपक गांगुर्डे यांनी केला असून, एलपीसी गुंजाळ व एलपीएन ठोंबरे यांनी तपास व न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.