नगर : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे ‘सेट’ परीक्षा (SET Exam) रविवार (ता.७) एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Univercity) वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित ही परीक्षा २८ महाविद्यालयांतील केंद्रावर पार पडणार आहे.
नक्की वाचा : आरबीआयचे नवीन पतधोरण जाहीर;रेपो दर स्थिर
मुंबईतील २८ केंद्रांवरून विद्यार्थी देणार ‘सेट’ परीक्षा (SET Exam 2024)
शिक्षण क्षेत्रात सेट या परीक्षेला अत्यंत महत्व आहे. मुंबईतील २८ केंद्रांवरून १४ हजार ४२६ विद्यार्थी ही सेट’ परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी आवश्यक असलेली प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठात होत असलेल्या या परीक्षेच्या यशस्वी नियोजनासाठी मुंबई शहर केंद्र प्रमुख म्हणून इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
अवश्य वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित
परीक्षा सुरळीत पार पडणार (SET Exam 2024)
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील एकूण २८ महाविद्यालयांतील केंद्रांवर ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व केंद्र प्रमुखांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले. परीक्षेसंबंधित कोणतीही गैरसोय होऊ नये आणि विविध शंकांचे निरसन करण्यासाठी परीक्षार्थींनी ९८६९०२८०५६ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधवा,असे आवाहन करण्यात आले आहे.