Seventh Pay Commission : नगर : मागील नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या (Seventh Pay Commission) प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचार्यांनी (Municipal employees) उपोषण सुरु होते. महापालिका कर्मचार्यांच्या प्रश्नाची आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत (Mumbai) ठाण मांडले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे. आज (मंगळवारी) रात्री उशिरा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.
अवश्य वाचा : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील
महापालिका कर्मचार्यांचा आठ वर्षांपासून लढा
मागील आठ वर्षांपासून महापालिका कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्र व्यवहार केला. निवेदने दिली. पाठपुरावाही केला. दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये कर्मचार्यांनी लाँग मार्चही काढला होता. मात्र, त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचार्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता. दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला होता. तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. लाईट, पाणी, स्वच्छता, साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला होता.
नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज
रात्री उशिरा प्रस्तावावर स्वाक्षरी (Seventh Pay Commission)
दरम्यान, महापालिका कर्मचार्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. आज (मंगळवारी) रात्री उशिरा महापालिका कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडले. दरम्यान, महापालिका कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न आमदार जगताप यांनी मार्गी लावल्याने महापालिका कर्मचार्यांनी आमदार जगताप यांचे आभार मानले.
चार हजार कर्मचार्यांना होणार फायदा
राज्यातील इतर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, नगर महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जात नव्हता. याच प्रश्नासाठी महापालिका कर्मचार्यांनी आठ वर्षांपासून लढा सुरू केला होता. कर्मचारी संघटनेतर्फे सरकार दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. आंदोलन करण्यात आली. आतही नऊ दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले होते. अखेर आमदार संग्राम जगतान यांनी महापालिका कर्मचार्यांच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घातल्याने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे १६०० कायमस्वरुपी व २५०० सेवानिवृत्त अशा एकून चार हजार कर्मचार्यांचा फायदा होणार आहे