Shah Rukh Khan : बॉलिवूड किंग शाहरुख खान साईचरणी

बॉलिवूड किंग शाहरुख खानने आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे. शाहरुखला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.

0
बॉलिवूड किंग शाहरुख खान साईचरणी

शिर्डी : बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी किंग खानने आज शिर्डीत साईबाबांचे (Shirdi Saibaba) दर्शन घेतले आहे. यावेळी शाहरुखला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी (A crowd of fans) जमली होती. चाहत्यांनी त्याला पाहताच एकच जल्लोष केला.

नक्की वाचा : गरजू मुलींसाठी पोलिसांचा ‘एक सायकल लेकीसाठी’ उपक्रम

शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय.’डंकी’ या सिनेमाची प्रदर्शनाच्या आधीपासूनच मोठी चर्चा आहे. हा सिनेमा २१ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने वैष्णो देवीचे दर्शन घेतले. आता ‘डंकी’ या सिनेमाच्या यशस्वीतेसाठी शाहरुखने साईदरबारी हजेरी लावली आहे. आगामी डंकी चित्रपट चांगला चालू द्या, अशी मनोमन प्रार्थना करत त्याने साईबाबाचरणी साकडे घातले आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने शाहरुखचा शाल आणि साई मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. 

अवश्य वाचा : ‘पोलिसांच्या आतही असतो माणुसकीचा झरा’ :शिवाजी डोईफोडे

शाहरुख खान शिर्डीत दाखल होतास त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी झाली होती. फ्लाईंग किस करत शाहरुखने चाहत्यांना अभिवादन केले आहे. यावेळी शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, मॅनेजर पूजा ददलानी आणि डंकी चित्रपटातील एक कलाकार देखील त्याच्यासोबत उपस्थित होते. त्यांनी सगळ्यांनी साईंचे दर्शन घेत आशीर्वाद घेतलेत. नवी मुंबईहून खाजगी विमानाने शाहरुख खान शिर्डीत पोहोचला. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी विमानतळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात होता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here