Shahid Shaikh : स्वत:वर विश्वास ठेवला की यश हमखास मिळते – शाहिद शेख

Shahid Shaikh : स्वत:वर विश्वास ठेवला की यश हमखास मिळते - शाहिद शेख

0
Shahid Shaikh : स्वत:वर विश्वास ठेवला की यश हमखास मिळते - शाहिद शेख
Shahid Shaikh : स्वत:वर विश्वास ठेवला की यश हमखास मिळते - शाहिद शेख

Shahid Shaikh : कर्जत : स्वत:वर विश्वास, मनात काही मिळवण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असली की यश नक्की मिळते. परिस्थिती कोणतीही असो पण प्रयत्न करीत राहिल्यास जीवनात अशक्य असे काही नसते. यासाठी कायम सकारात्मक विचार अंगीकारणे महत्वाचे ठरते. यश आपल्या सभोवताली कायम फिरत असते. आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते. आज एका पदाला गवसणी घातली असली तरी मला जिल्हाधिकारी व्हायचे असे स्वप्न मी बाळगून आहे असा विश्वास शाहिद शेख यांनी व्यक्त केला. ते दादा पाटील महाविद्यालय (Dada Patil College) आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कुंभेफळ (ता.कर्जत) येथील शाहिद अफसर शेख (Shahid Shaikh) याने नुकत्याच झालेल्या राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सहाय्यक कृषी संचालक पदावर आपले नाव कोरले.  

नक्की वाचा : लग्नाचं आमिष अन् अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये आरोपीला लाल टाकी परिसरातून अटक

सन्मानास उत्तर देताना शाहिद भावुक

कुंभेफळ या ग्रामीण भागातल्या दादा पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थ्यी शाहिद शेख याने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवत कर्जतच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवला. सध्या शाहिदची सहाय्यक कृषी संचालकपदी नियुक्ती झाली. दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी शनिवारी विद्यालयात त्याचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. शाहीद शेख हा कुंभेफळ येथील किराणा व्यावसायिक अफसर शेख यांचा मुलगा आहे. कुटुंबात जास्त कोणी शिक्षित नसताना त्याचे यश नक्की सर्वांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे नगरकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सन्मानास उत्तर देताना शाहिद भावुक झाला. आयुष्यात ज्या विद्यालयात जडण-घडण झाली. वेळप्रसंगी शिक्षकांचे बोलणे खाल्ले त्यांच्या हातून सन्मान घेताना आनंद होत आहे. 

अवश्य वाचा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग

मनात जिल्हाधिकारी पद मिळविण्याची आशा (Shahid Shaikh)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत असतानाच मला राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत क्लास वन पोस्ट मिळाली आहे. पण माझा प्रवास इथेच थांबवणार नसून यापुढे देखील युपीएससी परीक्षेची तयारी चालूच ठेवत मनात जिल्हाधिकारी पद मिळविण्याची आशा बाळगली आहे. ती पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या सत्कार सोहळ्यास शाहिदला अध्ययन करणारे प्रा. प्रवीण घालमे, विभागप्रमुख प्रा. जयदीप खेरमाळीस, प्रा.विकास भोसले, प्रा. दिलीप मगर, प्रा. सर्जेराव हळनवर, ग्रंथपाल नारायण मेंगाळ, प्रा.मीना खेतमाळीस, प्रा.संदीप इथापे, प्रा. विशाल शेळके, प्रा.संगीता भोसले, प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. अजितकुमार गुळवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते