Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी

Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी

0

Shambhuraj Desai : नगर : कर्जत तालुक्यातील होलेवाडी चिलवाडी येथे अतिवृष्टीने (Heavy Rain) निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी पाहणी केली. या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुती करणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.

Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी
Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

नुकसान ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास दिले आणून

कर्जत तालुक्यात होलेवाडी चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहणी करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेवून संवाद साधला. प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या आवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी वाड्या वस्त्यांपर्यत आले. यामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.

Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी
Shambhuraj Desai : अतिवृष्टी झालेल्या भागाची जलसंपदा मंत्री विखे, मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली पाहणी

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

तातडीने कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश (Shambhuraj Desai)

मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधीक्षक अभियंता अहिरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासित केले. कमी लोकसंख्येची वस्ती असली तरी अनेक वर्ष पुलाची मागणी पूर्ण झाली नाही. या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू कराण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. राज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले असून सर्व मंत्री जनतेत जावून परीस्थिती जाणून घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.