Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

0
Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार
Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थान विरोधात विशाल सुरपुरिया यांची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

Shani Shingnapur : नगर : शनिशिंगणापूरच्या (Shani Shingnapur) श्री शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ व देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यप्रकरणी (Financial Scam) अहिल्यानगरचे भाजपचे (BJP) कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जात शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर देवस्थानचे (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करून सक्षम प्रशासकाची नेमणूक करावी. विश्वस्त मंडळ यांनी केलेल्या अपहाराची सखोल चौकशीसाठी तात्काळ समितीची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

गुन्हा दाखल करण्याची मागणी

तसेच बनावट ॲपव्दारे झालेली फसवणूक ही देवस्थानची व भाविकांची असल्याने त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सायबर क्राईम, मुंबई व महाराष्ट्र राज्य, ओ. डब्लू, मुंबई यांच्या मार्फत तपास करण्याचे योग्य ते आदेश द्यावेत. शनिशिंगणापूरच्या देवस्थान व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडेही पत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

विश्वस्त मंडळाला कायद्याचा धाक नसल्याचा आरोप (Shani Shingnapur)

मात्र आजपर्यंत सदर प्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसुन सदरच्या विश्वस्त मंडळाला कुठलाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे हे भ्रष्टाचारी विश्वस्त मंडळ तातडीने बरखास्त करण्यात येऊन सक्षम प्रशासकाची व चौकशी समितीची त्वरित नेमणूक करावी, अशी तक्रार ॲड. अमित सुरपुरिया व ॲड. स्वाती जाधव यांच्या मार्फत विशाल सुरपुरिया यांनी केली आहे.