Shani Singhnapur : अहिल्यानगर : शनिशिंगणापूर (Shani Singhnapur) देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल (Oil) केमिकल (Chemical) युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा : रुईछत्तीसी येथे कुंटणखाण्यावर छापा ; ११ महिलांची सुटका
साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे परिणाम
जिल्ह्यातील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शनी शनिशिंगणापूर देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. परंतु आता, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनि देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत आहे. हे झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा : परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी निर्णय (Shani Singhnapur)
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमांनुसार, एक मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.