Shantigiri Maharaj : नगर : नाशिकमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabha Elections) प्रचारात चांगली रंगात आली आहे. पंतप्रधानांपासून ते केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्रीही प्रचारात विशेष सहभाग घेत आहेत. या प्रचारात मतदारांना (Voter) आकर्षित करण्यासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे, परंतु अपक्ष उमेदवार असलेल्या शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी प्रचारासाठी वेगळ्याच युक्तीचा अवलंब केला आहे.
हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार
अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात
नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे प्राबल्य मोठे असल्याचे मानले जाते. पण शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी भेटली आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त
प्रचारासाठी वेगळ्याच युक्तीचा अवलंब (Shantigiri Maharaj)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या मोठ्या नेत्यांच्या सभा पाहून अपक्ष उमेदवार असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आपल्या प्रचारासाठी वेगळेच तंत्र अवलंबल्याचे पाहायला मिळाले आहे. यासाठी त्यांनी सायकलवरून प्रवास करत नाशिकमध्ये प्रचार केला. शांतीगिरी महाराज यांनी याआधीही कधी रथात बसून, तर कधी बैलगाडी मधून प्रचार करत पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश दिला आहे. आणि आता सायकलवर बसून प्रचार करत आहेत. राजकीय पक्ष मोठं मोठ्या सभा, रोड शो करत असताना शांतीगिरी महाराजांच्या वेगवेगळ्या फंड्याची मतदारसंघात चांगलीच चर्चा होत आहे. आता नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे की शांतीगिरी महाराज बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.