Sharad Pawar : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान

लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं ते आमचे. ज्यांनी आमच्यासाठी काम केलं ते आमचे होतील. त्यांच्या हिताची जपवणूक करण्याची जबाबदारी आमची असेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

0
Sharad Pawar : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे';शरद पवारांचे सूचक विधान
Sharad Pawar : ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे';शरद पवारांचे सूचक विधान

नगर : लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (Ncp) काम केलं ते आमचे. ज्यांनी आमच्यासाठी काम केलं ते आमचे होतील. त्यांच्या हिताची जपवणूक करण्याची जबाबदारी आमची असेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

नक्की वाचा : निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;’पिपाणी’चिन्ह गोठवले

शरद पवार अमोल कोल्हेंच्या भेटीला (Sharad Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आज खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थान असलेल्या नारायणगाव येथे जाऊन भेट घेतली. यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी उपस्थित होते. त्यामुळे शरद पवारांनी केलेले हे विधान राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारी गोष्ट ठरली आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आम्ही लोकसभेला १० जागा लढल्या, त्यातील ८ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेटनुसार आम्ही एक क्रमांकाचा पक्ष आहोत. शरद पवार आज जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

अवश्य वाचा : जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाऊन; बँका, विमानतळाचं काम खोळंबले

आमदार अतुल बेनके यांनी घेतली शरद पवारांची भेट (Sharad Pawar)


अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार आले असताना अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाला पिंपरी चिंडवडमध्ये मोठे खिंडार पडले आहे. गव्हाणे यांच्यासह २४ पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी तुतारी हाती घेतली आहे. शरद पवारांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश झाला. विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता आहे. त्या तोंडासमोर ठेवून राजकीय लाभासाठी राजकीय लोकांच्या सत्तेसाठीच्या कुरघोड्या आपल्याला येत्या काळात आणखी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here