Sharad Pawar : ‘हे’ सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे नाही – शरद पवार

Sharad Pawar : 'हे' सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे नाही - शरद पवार

0
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar : नगर : केंद्र सरकारने (Central Govt) कांदा निर्यात बंद केली. शेतकऱ्यांना मिळणारे चार पैसे थांबविले. पांढरा कांदा पिकविणाऱ्या गुजरातमधील (Gujarat) शेतकऱ्यांना निर्यातीची परवानगी दिली. लाल व गावरान कांदा पिकविणाऱ्या महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांनी काय घोडे मारले. सोयाबीन, ऊस, साखर, इथेनॉलवर बंदी घालण्यात आली. सरकार शेतकरी विरोधी धोरणे घेत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे नाही, असा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन

नीलेश लंकेच्या प्रचारार्थ शेवगावमध्ये सभा (Sharad Pawar)

महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या शेवगाव येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार

शरद पवार म्हणाले (Sharad Pawar)

आपण ठोस भूमिका घेतली नाही तर संकटाला सामोरे जावे लागेल. कष्टकरी, दुष्काळी भागातील लोकांबाबत मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना किती आस्था आहे यावर शंका आहे. सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. १० वर्षांपासून त्यांच्याकडे सत्ता आहे. नोटा बंदी करून काय झाले. नोटा बदलायला लोक रांगेत उभे राहिले. त्यातील ७०० लोक मृत्यूमुखी पडले. नोटाबंदीने काळापैसा बाहेर आला नाही. सामान्यांच्या खिशात दमडीही पडली नाही, असे त्यांनी सांगितले.


सत्तेचा गैरवापर हे या सरकारचे वैशिष्ट्य आहे. टीका करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. टीका करणाऱ्यांना जेलमध्ये घालण्यात आले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकले. आदिवासी मुख्यमंत्री बहुमत असूनही तुरुंगात आहे. अरविंद केजरीवालांचे ही तेच झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत. लोकांचा मतांचा अधिकार गाजवू देत नाहीत. त्यांचा लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here