Sharad Pawar : भारतातील लोकशाही संकटात : पवार

Sharad Pawar

0
Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar : श्रीगोंदा : मोदी सरकारला आपल्या विजयाची खात्री नसल्यामुळे आपल्याला प्रचारासाठी जास्त वेळ मिळावा, यासाठी महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यात घेतली आहे. तसेच निवडणूक वेळापत्रक बदललं. सध्या भारतात लोकशाही संकटात आहे. संसदीय लोकशाहीची चिंता संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. भारताची लोकशाही ही आदर्श लोकशाही म्हणून जगात प्रसिध्द आहे. मात्र, गेली १० वर्षात मोदी सरकारने लोकशाही (Democracy) मोडीत काढून हुकूमशाही पद्धतीने राजकीय वाटचाल सुरु केली आहे. हीच हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी व लोकशाहीला वाचविण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी माझा आत्मा ५० नव्हे तर ५६ वर्ष संपूर्ण राज्यात फिरतोय, असा टोला खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलताना लगावला आहे.

हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल

पवार म्हणाले (Sharad Pawar)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, अनेक प्रधानमंत्री कालखंडात मी कामं केलय. यासोबत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी प्रश्न आणि सर्वसामान्य लोकांच्या अडचणी संदर्भात मी प्रत्यक्ष चर्चा करून अडचणी सोडवल्या आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, मोदी यांची हुकूमशाही, दडपशाही सुरू आहे. या हुकूमशाही विरोधात लोकशाही असे चित्र सुरु आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या तेजाने तळपून देशवासीयांना अधिकार दिले. ते संविधान बदलण्याची भूमिका मोदींनी हाती घेतली आहे. ते कदापी होऊ द्यायचे नाही असे राऊत यांनी सांगितले.

नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ

आमदार रोहित पवार म्हणाले (Sharad Pawar)

लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे लक्ष्मीच दर्शन होऊनही काय होणार नाही. श्रीगोंद्याचा ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार राहूल जगताप, निलेश कराळे, नीलेश लंके यांची भाषणे झाली. यावेळी प्रवीण दादा गायकवाड, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, जयंत वाघ, अंकूश काकडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, बाबासाहेब भोस, घनःश्याम शेलार, प्रशांत दरेकर, सुनंदा पाचपुते यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here