Sharad Pawar : नगर : निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले हाेते. दुसरीकडे अनेक मतदारसंघांतही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह (Symbol) देण्यात आले होते. त्यामुळे नगर, बीड, सातारा जिल्ह्यात पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. पिपाणीला मिळणारी मतं कदाचित शरद पवार यांच्या ‘तुतारी वाजवणरा माणूस’ या चिन्हाला पडली असती, तर साताऱ्यात भाजपच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला असता, असं जाणकारांचं मत आहे.
नक्की वाचा : नगर जिल्ह्यावर महाविकास आघाडीचे वर्चस्व
पवार गटाची ही भीती खरी ठरल्याची चर्चा
आमच्या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असे आहे. त्यामुळे अन्य उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. पिपाणी या चिन्हामुळे मतदारांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने घेतली होती. साताऱ्यातील निकाल पाहून पवार गटाची ही भीती खरी ठरल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिले नसते, तर साताऱ्यात कदाचित वेगळे चित्र असते, असे मत व्यक्त केले जात आहे.
अवश्य वाचा : विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवास उलगडणार ‘बंटी बंडलबाज’ चित्रपटातून
पिपाणी चिन्ह असणाऱ्याला ३७ हजार ६२ मते (Sharad Pawar)
साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण ५ लाख ७१ हजार १३४ मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना ५ लाख ३८ हजार ३६३ मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा ३२ हजार ७७१ मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला ३७ हजार ६२ मते मिळाली.