Sharad Pawar : नगर : लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटानं लढवलेल्या १० मतदारसंघांमध्ये (Constituency) पिपाणी चिन्हानं तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. त्यामुळे विधानसभेला (Assembly) तुतारीसमोर पिपाणीचा चांगलाच धोका वाढला आहे.
कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
पिपाणी चिन्हाच्या सर्व उमेदवारांना ४ लाख ३२ हजार मतं
शरद पवार गटानं लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ जिंकत घवघवीत यश मिळवलं. मात्र, शरद पवार गटाला वेगळ्याच टेन्शन सध्या सतावत आहे. ते म्हणजे पिपाणी हे चिन्ह. कारण राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या १० जागांवर पिपाणी चिन्हासह अपक्ष उमेदवारही उभे होते. आणि या सर्व उमेदवारांना मिळून तब्बल ४ लाख ३२ हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीच्या विरोधात अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्ह घेतल्यास डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण या पिपाणीमुळेच शरद पवार गटाला साताऱ्यात पराभव पत्करावा लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!
अपक्ष उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मते (Sharad Pawar)
सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मतं मिळालीयत. तर शशिकांत शिंदेंचा ३२ हजार मतांनी पराभव झाला आहे. दिंडोरीत बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मतं मिळाली. बीडमध्ये पिपाणीवर निवडणूक लढवलेल्या अशोक थोरात या उमेदवाराला ५४ हजार ८५० मतं मिळाली आहेत. बारामती मतदारसंघात सोयलशाह शेख या उमेदवारानं १४ हजार ९१७ मतं मिळवली आहे.
शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांनी २८ हजार ३३० मतं घेतली आहे. अहमदनगरमध्ये मोहन आळेकर या उमेदवाराला ४४ हजार ५९७ मतं मिळवली. माढ्यात पिपाणी चिन्ह असलेल्या रामचंद्र घुटुकडे यांना ५८ हजार ४२१ मतं मिळाली. भिवंडीत कांचन वखारे यांच्या पिपाणी चिन्हानं २४ हजार ६२५ मतं घेतली आहे. रावेरमध्ये एकनाथ साळुखेंच्या पिपाणीला ४३ हजार ९८२ मतं मिळाली आहे. वर्ध्यात मोहन रायकर यांच्या पिपाणीला २० हजार ७९५ मतं मिळाली. विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवाराचं मताधिक्य काही हजारांच्या घरात असतं. त्यामुळे निवडणुकीत जर तुतारीच्या विरोधात पिपाणी चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार मैदानात उतरले, तर शरद पवार गटाच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बिघडू शकतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारीला सर्वाधिक धोका पिपाणीचाच आहे.