Sharad Pawar : सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं; ‘या’ उपराेधिक बॅनरची चांगलीच चर्चा 

Sharad Pawar : सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं; 'या' उपराेधिक बॅनरची चांगलीच चर्चा 

0
Sharad Pawar : सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं; 'या' उपराेधिक बॅनरची चांगलीच चर्चा 
Sharad Pawar : सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं; 'या' उपराेधिक बॅनरची चांगलीच चर्चा 

Sharad Pawar : नगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) शरद पवार (Sharad Pawar) गटाला फारसे यश मिळणार नाही, असे सांगितले जात असतानाच त्यांनी १० पैकी ८ जागा जिंकून अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली. निकालानंतर कोल्हापूरात (Kolhapur) शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापूरी शैलीत शरद पवारांची स्तुती करताना विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे.

नक्की वाचा : राहुल झावरेंवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

बॅनर ठरत आहे चर्चेचा विषय (Sharad Pawar)

कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या दाभोळकर चौक परिसरात लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. “सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं”, असा एका ओळीचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. शरद पवारांचा फोटो आणि एका बाजूला पक्षाचे तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्हही आहे. रात्री हे बॅनर लागल्यानंतर याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.  या बॅनरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. तसेच या एका ओळीतून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत काय केलं? याची प्रचिती येत आहे. 

अवश्य वाचा : पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वातावरण तापलं ;आज ‘या’ ठिकाणी बंदची हाक

अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर मिळवलेले यश चर्चेत (Sharad Pawar)

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांना तेल लावलेला पैलवान म्हटलं जातं. परिस्थिती जेव्हा जेव्हा विपरित असते, तेव्हा तेव्हा शरद पवार राजकीय पटलावर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत असतात. २०१९ चा महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग असो किंवा अजित पवारांनी फूट पाडल्यानंतर लोकसभेत मिळवलेले यश असो, शरद पवारांच्या राजकीय चातुर्याची ही अलीकडील उदाहरणे आहेत. शरद पवारांचे राजकीय डावपेच हे भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकतात.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी होते. मात्र, संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य घेता आलं नाही.

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना बारामती, शिरुर, माढा मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. त्यामुळे अजित पवार गट पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा जोरदार लीड घेत अजित पवार यांना शरद पवार यांनी चांगलाच धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा इशाराच एकप्रकारे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here