Sharad Pawar : ही भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

0
Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल
Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

Sharad Pawar : नगर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) हे जनतेला कायम माेदी सरकार, माेदींची गॅरटी सांगत हाेते. परंतु, हे भारत सरकार (Government of India) आहे. याची जाणीव आज जनतेने त्यांना करून दिली. राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. परंतु, विराेधकांवर टीका करताना माेदींनी काेणतेही तारतम्य बाळगले नाही. माझा भटकती आत्मा म्हणून माेदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला, पण ही भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही. तुमच्या विराेधात कायमच आवाज उठवणार, असा हल्लाबाेल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी माेदींवर केला.

Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल
Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

नक्की वाचा : भारताचा पाकिस्तानवर सहा धावांनी दमदार विजय 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिन

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आज नगरमधील न्यू आर्ट काॅलेजच्या प्रागंणात पार पडला. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अमाेल काेल्हे, नीलेश लंके, धैर्यशील माेहिते पाटील, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, अमर काळे, बजरंग साेनवणे, आमदार राेहित पवार, प्राजक्त तनपुरे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, शेतकरी पक्षाचे नेते जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर आदी उपस्थित हाेते. 

Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल
Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

अवश्य वाचा : माेदींच्या तिसऱ्या टर्मची वाटचाल गाैरवशाली ठरणार; महसूलमंत्र्यांचा विश्वास

शरद पवार म्हणाले (Sharad Pawar)

” लाेकसभा निवडणुकीनंतर माेदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. परंतु, त्यांनी बहुमत नसतानाही सरकार बनवले. नरेंद्र माेदी हे कधी भारत सरकार म्हणत नव्हते. परंतु, लाेकांनी त्यांना दाखवून दिले की, हे भारत सरकार आहे. पंतप्रधान या पदावर बसलेल्या व्यक्तींनी सर्व घटकांना घेऊन चालले पाहिजे. परंतु, काही घटकांचा त्यांनी जाणूनबुजून द्वेष केला. पक्षाबाबत असली, नकलीची भाषा केली. प्रभू श्रीरामाचा केवळ राजकारणासाठी वापर केला. परंतु, तेथेही जनतेने भाजपचा पराभव केला. लाेकसभा निवडणुकीत जनतेनं आम्हाला उत्तम साथ दिली.  आपल्याला देश प्रगतीपथावर न्यावा लागेल. आगामी विधानसभेला सामाेरे जाऊ. आमचे खासदार दिल्लीला जातील. आता जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतील,” असा विश्वास पवार यांनी जनतेला दिला. 

Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल
Sharad Pawar : भटकती आत्मा तुम्हाला साेडणार नाही; शरद पवारांचा माेदींवर हल्लाबाेल

राेहित पवार म्हणाले, ”संघर्ष करण्याची ताकद पवार साहेबांमुळे मिळाली. शेतकरी, युवा आदी सामान्य लाेकांना पवार साहेबांनी न्याय दिला. त्यामुळे लाेकसभेत माेठा विजय मिळाला. दहा पैकी आठ खासदार निवडून आले. पवार साहेबांनी विश्राम घेतला पाहिजे, असे म्हणणाऱ्या विराेधकांना निवडणुकीत चितपट करून त्यांनाच विश्राम दिला आहे. विधानसभेत भाजप नक्कीच हद्दपार हाेईल,” अशी टीका त्यांनी विराेधकांवर केली. 


शशिकांत शिंदे म्हणाले, ”देशाचे पंतप्रधानही लंके यांनाही ओळखू लागले आहे. मी थाेडा कमी पडलाे. पण लढलाे. तुतारी आणि पिपाणी यात गाेंधळ झाल्यामुळे माझा पराभव झाला. परंतु, विधानसभेला आणखी जाेमाने लढून शरदचंद्र पवारांच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रात आणू, असे ते म्हणाले.”


प्राजक्त तनपुरे म्हणाले, ”आपली पक्षाची सभा मैदानात, विराेधकांची सभा हाॅलमध्ये झाली, अशी टीका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर त्यांनी केली आहे. आगामी विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
उत्तमराव जानकर म्हणाले, ”शरद पवार साहेब हे सर्व घटकांना साेबत घेऊन चालणारे नेतृत्त्व आहे. धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आगामी विधानसभेत महाविकास आघाडीचे शंभर उमेदवार निवडणून आले पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नांची परकाष्ठा करणार आहाेत.” 


भास्कर भगरे म्हणाले, ”पवार साहेबांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी दिली. यापुढे मायबाप जनेतला न्याय देण्यासाठी संसदेत आवाज उठवणार आहे. ”


अमर काळे म्हणाले, ”पवार साहेबांचा जरब देशात आहे. पंतप्रधान, याेगी आदित्यनाथ आदी दिग्गज नेत्यांना माझ्या मतदारसंघात प्रचाराला यावं लागले. परंतु, पवार साहेबांची किमया मला जनतेने मला निवडून दिले. आगामी विधानसभेसाठी जीवाची बाजी लावून कमीत कमी ८५ आमदार निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी करू, असे त्यांनी सांगितले.” बजरंग साेनवणे म्हणाले, ”देशाचा खरा नेता काेण, तर शरद पवार साहेब आहे. आगामी विधानसभेला मराठवाड्यातील सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचे काम करणार आहे.”

नीलेश लंके म्हणाले, ”विधानसभेवर आता झेंडा फडकवायचा आहे. नगर जिल्ह्यातील बारा आमदार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार आहे. पवार साहेबांच्या तालमीतला मी पठ्या आहे. संसदेत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर संसदच बंद करू, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. सगळ्यांचा नाद करायचा, पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा.” 


अमाेल काेल्हे म्हणाले, ”सुजल्यावर कळतयं की पवार साहेबांनी मारलं कुठं, हा काेल्हापूर शैलीत लावलेलं बॅनरनी चांगल्यांची जिरवली आहे. शेतकरी समाज तुम्हाला विधानसभेला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. घरवापसी करणाऱ्या आमदारांपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांचा विचार करावा. विधानसभेला पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार आहे.”


जितेंद्र आव्हाड म्हणाले, ”पुराेगामी विचारच जिवंत राहिला पाहिजे. ही भूमिका साहेबांनी घेतली.  भाजपला ४०० पार करून संविधान बदलायचे हाेते. आज त्यांच्या जागा आल्या नाही, तर आता म्हणतात आम्हाला संविधान बदलायचे नव्हते. मनुस्मृती हेच भाजपचे संविधान आहे. परंतु, आम्ही तुम्हाला मनुस्मृती आणून देणार आहे.” 


सुप्रिया सुळे म्हणाल्या, ”पक्षाच्या २५ वर्षांच्या प्रवासात अनेकांचे याेगदान आहे. पक्ष १८ वर्ष सत्तेत राहिला आहे. पुढच्या तीन महिन्यात एकच लक्ष्य आणि विधानसभा जिंकून आणायची आहे. संसदेत पहिला दुधाच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार आहे. आठ खासदार आता संसदरत्न हाेणार आहे.”


शेतकरी पक्षाचे जयंत पाटील म्हणाले, ”महाराष्ट्रात एकमेव टायगर आहे. ताे म्हणजे पवार साहेब आहे. भिवंडी लाेकसभा मतदारसंघात बाळ्यामामाने एका मंत्र्यांला पाडले. ताे खरा आमच्या आग्री समाजाचा हिराे आहे.” 


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ”महाराष्ट्राभर पवारांची लाट आपण पाहिली. काही लाेकांनी पवार साहेबांना बारामती अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्रभर पिंजून काढून पवार साहेबांनी दहा पैकी आठ खासदार निवडून आणले. रिश्ते मै ताे हम तुम्हारे बाप आहे, नाम है शरद पवार, असा डायलाॅग मारून त्यांनी विराेधकांना डिवचलं आहे. विधानसभेत नव्या चेहऱ्यांना पवार साहेब संधी देतील. आमचे खासदार संसदेत आदर्श काम करतील. राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाला नापसंती दिली आहे. आगामी विधानसभेला एकजुटीने काम करा, विजयाची पताका माेठ्या ताकदीने पुढे नेऊ. ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here