Sharad Pawar : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत ताेडगा काढा : शरद पवार

Sharad Pawar : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत ताेडगा काढा : शरद पवार

0
Sharad Pawar : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत ताेडगा काढा : शरद पवार
Sharad Pawar : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत ताेडगा काढा : शरद पवार

Sharad Pawar : नगर : मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) केंद्र सरकारने (Central Govt) पुढाकार घेऊन ताेडगा काढला पाहिजे, केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा: फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी : मेधा कुलकर्णी

केंद्र आणि राज्य सरकारच्या धाेरणात बदल करावा लागेल

बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते. केंद्र सरकारने आरक्षणाबाबत खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धाेरणात बदल करावा लागेल. राज्य आणि केंद्र सरकारने एका मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचा एक सामाजिक तणाव निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबादारी आहे.

अवश्य वाचा : माझं लाेकसभेतलं पहिलं भाषण इंग्रजीतच : नीलेश लंके

भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल (Sharad Pawar)

आम्ही इथे राजकारण आणू इच्छित नाही. पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घालून ताेडगा काढला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात ही भूमिका मांडून चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता यावर केंद्रातील भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here