Sharad Pawar : नगर : दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. मात्र, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आंदाेलनाकडे दुर्लक्ष केले आहे. मंत्री विखे यांनी तातडीने शेतकऱ्यांना आश्वासित करावे, अन्यथा येत्या काळात आंदोलन तीव्र स्वरूपात केले जाईल. आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे देखील आंदोलनाच्या रिंगणात उतरतील, असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला आहे.
नक्की वाचा: शालिनी विखे पाटलांचे पांडुरंगाला साकडे; पाऊस पडू दे.. शेतकरी सुखी होऊ दे.. संकटे दूर कर
कांदा प्रश्न व दुधाला चाळीस रु. हमीभावाची मागणी
कांदा प्रश्न व दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी सकाळपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आज दुसरा दिवस असून मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय याबाबत झालेला नाही. आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांसह लंके यांनी दिला.
अवश्य वाचा: जिल्हादंडाधिकाऱ्यांचे १२ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्हाध्यक्ष फाळके म्हणाले, (Sharad Pawar)
”जिल्हाधिकारी हे निवेदन घेण्यासाठी आले नाही, किंबहुना मंत्री विखे यांनी त्यांना येण्यास मज्जाव केला असेल. दूध प्रश्नासाठी शेतकरी आक्रोश करत आहे. मंत्री विखे यांनी उपोषण स्थळी येऊन शासनाची याबाबत भूमिका काय आहे, हे स्पष्ट करावे. शासनाने जाहीर केलेले हमीभाव फसवे आहे, असे देखील टीका फाळके यांनी केली. पालकमंत्री विखे यांनी उपोषणस्थळी येत दुधाला हमीभाव मिळवून देऊ, असे आश्वासित केले पाहिजे, अशी मागणी फाळके यांनी केली. दूध दरावरून छेडलेल्या आंदोलनाबाबत प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. आता आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देखील नगरला येणार आहेत. तसेच येथे दोन दिवसात कोणताही निर्णय झाला नाही, तर शरद पवार हे देखील उपोषणस्थळी येतील, असे फाळके यांनी स्पष्ट केले.