Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा

Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा

0
Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा
Sharad Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत मविआ २२५ जागा जिंकणार; शरद पवारांचा दावा

Sharad Pawar : नगर : महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल, देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूया, असे आवाहन करत, विधानसभेच्या (Assembly) २८८ जागा आहेत. त्यापैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील, असा मोठे भाकित शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका

सुधाकर भालेराव शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलताना दिसत असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

यावेळी ते बाेलताना म्हणाले, (Sharad Pawar)

”निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत. चित्र बदलायचे असेल, तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात, ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला सुरुवात केली आहे. उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येत आहेत. गेल्या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला. मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केला. मतदारांनी मते दिली, विधानसभेत पाठवले, त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली. पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, असे सूतोवाच करत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्ची गरज आहे,” असे शरद पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here