Sharad Pawar : तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री हे दुर्देव; शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

Sharad Pawar : तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री हे दुर्देव; शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

0
Sharad Pawar : तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री हे दुर्देव; शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल
Sharad Pawar : तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री हे दुर्देव; शरद पवारांचा अमित शाहांवर हल्लाबोल

Sharad Pawar : नगर : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ज्या व्यक्तीला त्याच्या राज्यातून तडीपार केले ती व्यक्ती देशाच्या गृहमंत्री (Home Minister) पदावर विराजमान असणे ही विचीत्र बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नक्की वाचा : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

अमित शाहांच्या टीकेला उत्तर

अमित शाह यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना पवार यांनी शाह यांच्या तडीपारीचा उल्लेख केला. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं, तो माणूस आज देशाचं गृहमंत्रीपद सांभाळतोय. देशाचं संरक्षण करतोय, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला.

अवश्य वाचा: नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल

माझ्या बोटावर माझा पूर्ण विश्वास (Sharad Pawar)

यावेळी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय, असं आपल्या भाषणात म्हटलं. टोपे यांच्या या विधानवर शरद पवार यांनी कोटी केली. ते म्हणाले, टोपे म्हणतात की ते माझं बोट पकडून राजकारणात आले. पण मी त्यांच्या मताशी सहमत नाही. कारण एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका भाषणात मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं म्हटलं होतं. पण मी कुणाच्याही हातात माझं बोट देत नाही, देणार नाही. कारण माझ्या बोटावर माझा पूर्ण विश्वास आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here