Sharad Pawar : अनिल राठाेड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी; शरद पवारांचे नगर विधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य

Sharad Pawar : अनिल राठाेड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी; शरद पवारांचे नगर विधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य

0
Sharad Pawar : अनिल राठाेड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी; शरद पवारांचे नगर विधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य
Sharad Pawar : अनिल राठाेड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी; शरद पवारांचे नगर विधानसभेसंदर्भात सूचक वक्तव्य

Sharad Pawar : नगर : नगर शहर विधानसभा (Assembly) मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल राठाेड (Anil Rathod) यांनी भरीव असे काम केले आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग आपल्याला आगामी निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो. अनिल राठाेड यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला नगर विधानसभा निवडणुकीत चांगली संधी आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

विधानसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात सखोल चर्चा

पुणे येथे मोदी बागेत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. त्यावेळी विधानसभा मतदारसंघाच्या जागेसंदर्भात सखोल चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान टिळक स्मारक येथे ठाकरे गटाचे युवा सेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड, गिरीश जाधव, मंदार मुळे यांची शरद पवार यांच्या समवेत माेदी बागेत भेट झाली. आमदार रवींद्र धंगेकर यावेळी त्यांच्या समवेत होते. शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे.

अवश्य वाचा: राज्यात पावसाचा जोर ओसरणार! पुढील पाच दिवस ‘या’ ठिकाणी अलर्ट

मतदारसंघात शिवसेना सक्षमपणे कार्यरत (Sharad Pawar)

आमदार अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव असे कार्य केलेले आहे. त्यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांची या मतदारसंघावर पकड आहे. शिवसेना या भागात सक्षमपणे कार्यरत आहे. याविषयी समाधान व्यक्त केले. दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या कार्यकर्तृत्चाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवारालाच चांगली संधी आणि यश मिळेल याविषयी आपल्या मनात तीळमात्र शंका नाही. आपण सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चर्चा केली आहे. त्यांच्या पुण्याईचा उपयोग सेनेने करून घ्यावा आणि ही जागा निश्चितपणे जिंकण्याची संधी सोडू नये, असा सल्ला त्यांनी दिला.


दरम्यान, आमदार अनिल राठोड यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी केला. मागील दोन टर्म निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी स्वार्थी कपटी राजकारण केले आणि निसटत्या फरकाने राठाेड पडले. याचा वचपा, या निवडणुकीत आपण निश्चितपणे काढू, असे सर्वांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here