Sharad Pawar : मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनाेज जरांगेंच्या उपस्थितीत सर्वपक्षीय बैठक घ्या; मराठा आरक्षणावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

0
Manoj Jarange

Sharad Pawar : नगर : मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी मागणी केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणाबाबतची (Maratha Reservation) त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला (Maratha society) आरक्षण देण्याचे अधिकार मोदी सरकारला आहेत. मोदी सरकारने (Modi Govt) मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी आम्ही त्यांना जे हवे आहे, ते सहकार्य करायला तयार आहोत.

नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’- रोहित पवार

पुणे येथे पत्रकार परिषदेत बाेलताना ते म्हणाले,

”मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा तिढा साेडवण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बाेलवावी, असे सूचवले आहे. आम्ही विराेधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहून आमची सहकार्याची भूमिका राहील. या बैठकीला मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसी नेत्यांनाही बाेलवावे, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

पवार पुढे म्हणाले, (Sharad Pawar)

”आज राज्यात दोन समाजामध्ये कटुता निर्माण होणार नाही, यादृष्टीने पावलं टाकली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील, असे त्यांना सूचवले आहे. आज ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा निर्णय न्यायव्यवस्थेने घेतला आहे. या निर्णयाची अडचण आली, तर महाराष्ट्रातील सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका मांडावी. तामिळनाडूमध्ये यापूर्वी ७६ टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले होते, तो निर्णय न्यायालयात टिकला होता. हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. महाराष्ट्रातील घटक याबाबत कुठल्याही प्रकारची राजकीय मतभेद न करता केंद्र सरकारने यामध्ये पुढाकार घेतल्यास आमचे पूर्ण सहकार्य असेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here