Sharad Pawar : राष्ट्रवादी फुंकणार विधानसभेचे रणशिंग; शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा उद्या नगरमध्ये

Sharad Pawar : राष्ट्रवादी फुंकणार विधानसभेचे रणशिंग; शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा उद्या नगरमध्ये

0
Sharad Pawar : राष्ट्रवादी फुंकणार विधानसभेचे रणशिंग; शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा उद्या नगरमध्ये
Sharad Pawar : राष्ट्रवादी फुंकणार विधानसभेचे रणशिंग; शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा उद्या नगरमध्ये

Sharad Pawar : नगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार (Sharad Pawar) गट) काँग्रेसतर्फे राज्यात शिवस्वराज्य यात्रा (Shiv Swarajya Yatra) काढण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २६) या यात्रेचे नगर जिल्ह्यात आगमन होत आहे. यात अकोले, शेवगाव, श्रीगोंदे, नगर शहर, राहुरी व पारनेर या मतदारसंघांत फिरणाऱ्या या यात्रेद्वारे निवडणुकीचे (Election) रणशिंग फुंकले जाणार आहे.

नक्की वाचा: राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस;पुण्याला रेड अलर्ट तर नगरमध्येही जोरदार बरसणार

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा आठ जागांवर दावा

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतून उद्या गुरूवार (ता. २६) व शुक्रवार (ता. २७) सप्टेंबरला शक्तिप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघांत समर्थकांशी संवाद साधत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार आदी यात्रेत सहभागी हाेणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अकोले, शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदे, नगर शहर, राहुरी व पारनेर या सहा मतदारसंघांसह कर्जत-जामखेड व कोपरगाव अशा आठ जागांवर दावा केला आहे.

अवश्य वाचा: पारनेरमध्ये आमदार कोण होणार?

अकोलेत शिवस्वराज्य यात्रेची पहिली जाहीर सभा (Sharad Pawar)

असे राहणार शिवस्वराज यात्रेचे स्वरुपगुरुवारी (ता. २६) रोजी सकाळी १० वाजता अकोले तालुक्यातील कोतूळ येथे शिवस्वराज्य यात्रेची पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता शेवगाव येथील खंडोबानगर येथे दुसरी जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी श्रीगोंदे येथील संत मोहम्मद महाराज मैदानात तिसरी सभा होणार आहे. या यात्रेचा मुक्काम नगर शहरात होणार आहे. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता टिळकरोड सभा होणार आहे. येथून ही यात्रा शिर्डीकडे रवाना होणार आहे. तेथे दुपारी ४ वाजता राहुरी येथील नवी पेठेत जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर सभा होणार आहे. तेथून ही यात्रा पारनेरकडे रवाना होणार आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे सायंकाळी सभा होणार आहे. तेथून ही यात्रा पुणे किंवा इस्लामपूरकडे जाणार आहे.