Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल

Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल

0
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल
Sharad Pawar : शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल

Sharad Pawar : नगर : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदार संघाच्या (Baramati Assembly Constituency) प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नक्कल करत त्यांना चिमटा काढला आहे.

नक्की वाचा: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ

अजित पवारांच्या कृतीवरून शरद पवारांनी काढला चिमटा

प्रचाराची सुरुवात करताना अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये सभा घेतली होती. यावेळी युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता, यावेळी त्यांनी भाषण थांबवलं, पाणी प्यायले आणि त्यानंतर त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं. अजित पवारांच्या याच कृतीवरून शरद पवारांनी आज त्यांना चिमटा काढला.

अवश्य वाचा: माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला,अजित पवार गटाकडून मिनल साठे मैदानात

शरद पवार म्हणाले की, (Sharad Pawar)

“सहा महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंची निवडणूक होती. त्यावेळेला (लोकसभा निवडणूक) त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. त्यावेळी त्यांच्या नेत्यांची (अजित पवार) भाषणं काय होती ती आठवून पाहा. त्यांचे नेते म्हणाले होते, साहेब (शरद पवार) येतील, तुमच्या भावनेला हात घालतील, भावनाप्रधान होतील, मात्र तुम्ही भावनाप्रधान होऊ नका. साहेब डोळ्यात पाणी आणतील आणि मतं मागतील. परंतु, तुम्ही भावनाप्रधान होऊन मत देऊ नका. त्यांच्या नेत्यांनी त्या सभेतून मलाही सल्ला दिला होता. मात्र त्याच नेत्यांचं कालच्या सभेतील भाषण आठवून पाहा. कालच्या सभेत ते नेते काय बोलले ते पाहा”. त्यानंतर शरद पवारांनी खिशातला रुमाल काढला, चेहरा आणि डोळे पुसले. त्यानंतर सभेला उपस्थित लोकांनी जोरदार हसून दात दिली.