Sharad Pawar नगर: ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शरद पवार सध्या बारामतीत (Baramati) वास्तव्यास आहेत. बारामती येथून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणलं गेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचं सांगितले जात होतं. आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ‘तेरावा’ विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर नातेवाईक उपस्थित राहणार होते. परंतु आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत होता.
हे देखील वाचा: कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव
डॉक्टरांनी केली नियमित तपासणी
शरद पवार यांना खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरंची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होते.
नक्की वाचा: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
सोबत कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Sharad Pawar)
शरद पवार यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही मिनिटांपूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्यासोबत शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेदेखील आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकादेखील आहे. पवार यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केले जाणार आहेत.




