Sharad Pawar : नगर : महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections) रंगत वाढताना दिसून येत आहे. येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार असून महाराष्ट्रातून एकूण सात जागांसाठी सदस्य निवडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय (Political) हालचालींना वेग आला आहे आणि सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून (BJP) चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
महाविकास आघाडीकडून मात्र मोठा राजकीय डाव
महाराष्ट्रातील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता हे चार उमेदवार निवडून येण्याची शक्यता मजबूत मनाली जात आहे. महाविकास आघाडीकडून मात्र मोठा राजकीय डाव टाकत शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम
शरद पवारांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची रणनीती (Sharad Pawar)
मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गट शरद पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याची रणनीती आखात असल्याचे सांगितले जात आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



