Sharad Pawar नगर : शरद पवार (Sharad Pawar) गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं, स्वतः शरद पवार यांनी मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांना सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी आजच्या बैठकीला येताय म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केली. यावर बोलतांना शरद पवारांनी जोरदार टीका करत इशारा (Warning) दिलाय.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन
शरद पवार म्हणाले (Sharad Pawar)
“इथल्या दमदाटी करणाऱ्या आमदारांना मला सांगायचंय, बाबा रे, तू कुणामुळे आमदार झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला कोण आलं होतं आठवतंय का? पक्षाचा फॉर्म आणि चिन्ह कुणी दिलं? माझ्या सहीनं तू तुझा अर्ज भरला होता आणि आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता?” अशी संतप्त विचारणा शरद पवारांनी केली. तसेच, “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला. मी कधी या रस्त्याने जात नाही, पण तशी स्थिती निर्माण झाली तर कुणाला सोडत नाही”, असंही शरद पवार म्हणाले.
नक्की वाचा: मराठ्यांनी पीएम मोदींविरोधातच थाेपटले दंड; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार
आमदार शेळकेंनी पत्रकार परिषदेत दिले स्पष्टीकरण (Sharad Pawar)
शरद पवारांच्या भाषणानंतर काही वेळातच आमदार सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मेळाव्याचं आयोजन करणाऱ्यांनी शरद पवारांना काही माहिती दिली. ‘मावळमधले शेकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांबरोबर यायला तयार आहे, तुम्ही त्यासाठी मावळमध्ये या’ अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केलं. सुनील शेळकेनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला न जाण्याबाबत दमदाटी केल्याचं शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शरद पवारांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. ते आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं”, असं सुनील शेळके म्हणाले.