Sharad Pawar : नगर : देशातील तपास यंत्रणांचा लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) डोळ्यासमोर ठेवून गैरवापर सुरू आहे, अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी राेहित पवार यांच्यावरील ईडीने (ED) केलेल्या कारवाईवरून केली आहे.
हे देखील वाचा : सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळवला जातोय : राज ठाकरे
बारामती अॅग्रोशी संबंधित जमीन ईडीकडून जप्त
पुण्यातील पत्रकार परिषदेत माध्यमांशी बाेलताना त्यांनी केली. आमदार रोहित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याची १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. यावरून खासदार शरद पवार यांनी टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, ”सध्याचे मोठे उदाहरण म्हणजे कर्नाटकातील असून ईडीने शिवकुमार यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोश मुक्तता केली.
नक्की वाचा : ‘फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका’ – मनोज जरांगे
ईडीकडून जाणून बुजून कारवाई (Sharad Pawar)
रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यावर कारवाई केली जात आहे. रोहित पवार यांच्यावर आरोप असा आहे की सरकारने कारखाना विकायला काढला. टेंडर काढले आणि तो कारखाना रोहित पवार यांनी घेतला. पण राज्यातील अनेक कारखाने हे विकले गेले. त्यातील काही कारखाने हे २५ कोटीच्या आत विकले गेले होते. या कारखान्यांवर कोणतीच नोटीस अथवा कारवाई ईडी किंवा सरकारने केली नाही. पण रोहित पवार यांनी घेतलेल्या कारखान्यावर कारवाई केली जात आहे. ईडीकडून ही कारवाई जाणून बुजून केली जात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.