Sharad Pawar : नगर : साताऱ्यात महायुतीकडून तिकीट मिळावे, यासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्लीवारी केली. भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तरीही उदयनराजे यांची अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उदयनराजे यांनी तुमच्याशी काही संपर्क केला का, असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar) यांना माध्यमांकडून विचारण्यात आला. या प्रश्नावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर दिलं. तसंच उदयनराजे यांच्या स्टाइलमध्ये कॉलर उडवून उदयनराजेंनाच डिवचलं आहे.
हे देखील वाचा : वसंत मोरेंची वाटचाल ‘वंचित’च्या दिशेने; प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट
कोणाला संधी देणार याकडे लक्ष (Sharad Pawar)
साताऱ्यात लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणूक लढवत नसल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं आहे. उदयनराजे भोसले यांना श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणुकीत हरवलं होतं. श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर आता शरद पवार साताऱ्यातून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शरद पवार यांनी आज सातारा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. साताऱ्यात झालेल्या या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी साताऱ्यात उमेदवार कोण असेल, हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं सांगितलं.
नक्की वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार
शरद पवार म्हणाले (Sharad Pawar)
”साताऱ्यात बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. पण पक्षाचं काम करणार असल्याचंही सांगितलंय. काही जणांनी माझं नावही साताऱ्यासाठी सूचवलंय पण इतर जबाबदाऱ्या असल्यानं ते शक्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर ही नावे सुचवली असल्याचंही पवारांनी सांगितलं.