Sharad Pawar:’महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो’- शरद पवार

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या.मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी मी दोन पावलं मागे आलो, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.

0
Sharad Pawar:'महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो'- शरद पवार
Sharad Pawar:'महाविकास आघाडीच्या एकीसाठी दोन पावलं मागे आलो'- शरद पवार

नगर : लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळायला हव्या होत्या.मात्र त्यावेळी महाविकास आघाडीचे ऐक्य टिकून राहावे, यासाठी मी दोन पावलं मागे आलो, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय;सूर्या-बुमराहची तुफानी खेळी

या बैठकीला  सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, यांच्यासह पक्षाचे आठ खासदार  उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांचे हे वक्तव्य पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल, असे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा : वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी दिला स्वच्छतेचा आणि वृक्षारोपणाचा संदेश

‘आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले’ (Sharad Pawar)

शरद पवार यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त जागा मिळायला हव्या होत्या. परंतु, महाविकास आघाडीची एकी कायम राहावी, यासाठी मी दोन पावलं मागे आलो. आपण एकत्रित राहिलो म्हणून लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. उद्यापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे, याची तयारी ठेवा. त्यासाठी लोकांची जास्तीत जास्तं काम करा. राज्यातील लोकांचा दिल्लीशी फारसा संबंध येत नाही. राज्यात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असा आदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here