Sharad Pawar : सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही,असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. ते बारामतीत (Baramati) पत्रकारांशी बोलत होते. माळेगाव (Malegaon) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत.
विरोधकांना न्याय कसा देणार? (Sharad Pawar)
आपण आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत, सरकारी पदावर असताना सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो विरोधकांना न्याय कसा देईल ? असं शरद पवार म्हणाले.
अवश्य वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली
निवडणुकीत अजित पवार विजयी (Sharad Pawar)
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते.या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून ‘ब वर्ग गटातून’ उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. १०२ पैकी १०१ मतं वैध ठरली. त्यातील अजित पवारांना ९१ मतं मिळाली आहेत. सहकारी संस्था या गटासाठी मतदान करतात. यामध्ये अजित पवारांनी बाजी मारली आहे.