Sharad Pawar : जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना महाराष्ट्रात आणले जात आहे,असं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. सत्ताधारी पक्षाची जातीयवादी भूमिका आहेच आहे, ती पुन्हा एकदा त्यांनी समोर आणली आहे. बटेंगे तो कटेंगे या प्रचारावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुका येतात आणि जातात,पण धर्मा-धर्मात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम कुणी करू नये. पण भाजप (BJP) आणि त्यांच्या मित्र पक्षांना याचे भान नाही,असेही शरद पवार म्हणाले.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली (Sharad Pawar)
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत आम्हाला चिंतेचे कारणच नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती चांगली आहे. इथले मतदार भाजपच्या विचारसरनीला अजिबात पाठींबा देणार नाहीत,अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.
अशोक चव्हाण म्हणजे संधीसाधु (Sharad Pawar)
चव्हाण कुटुंबाला काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले,देशाचे गृहमंत्री पद,अर्थमंत्री पद, संरक्षण मंत्रिपद दिले, स्वतः अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पद दिले. पक्षानी आणखी काय द्यायचे ? लोक समजतात.आता त्यांना काय शिकवायचे ते शिकवतील,अशी प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. शंकरराव चव्हाण यांनी एकदा काँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढला होता. पण त्यांच्या नावात काँग्रेस हा शब्द होता, विचारधारा काँग्रेसची होती, पण अशोक चव्हाण एकदम विरोधातील विचारधारेसोबत गेले, हा संधीसाधूपणा आहे,असेही शरद पवार म्हणाले.